Latest News

Latest News
Loading...

अपंग विद्यार्थिनीच्या शिक्षणाची विजय चोरडिया यांनी स्विकारली जबाबदारी

प्रशांत चंदनखेडे वणी 

धेय्य, इच्छा, आकांक्षा व शिक्षणाची जिद्द मनी व कर्तृत्व अंगी असतांना देखील अपंगत्वामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीला सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांनी मदतीचा हात दिला आहे. तिच्या शिक्षण व कर्तृत्वाआड येणारे अपंगत्व विजय चोरडिया यांच्या जिव्हाळी लागले. त्यांनी लगेच त्या अपंगत्व आलेल्या विद्यार्थिनीची तिच्या घरी जाऊन भेट घेतली, व तिच्या शिक्षणाची वाट सुकर करून दिली. विजय चोरडिया यांनी तिच्या शिक्षणातील अडथळेच दूर केले. तिला भविष्यात शिक्षणासाठी कुठलीही मदत करण्याची त्यांनी हमी दिली आहे. एवढेच नाही तर तिला संगणक व इतर शैक्षणिक साहित्य त्यांनी तात्काळ पुरविले. दातृत्व भावना जपणाऱ्या विजय चोरडिया यांनी गरजू गरिबांना नेहमी सढळ हाताने मदत केली आहे. लोकांचं दुःखं व दैना पाहून त्यांच्यात मदतीचा भाव जगतो. ते त्यांना हरसंभव मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हातून आजपावेतो अनेक मदत कार्य घडली आहेत. सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात नेहमीच त्यांनी उत्स्फूर्तपणे मदत केली आहे.

शहरातील श्रेया अनिल भोंगळे या विद्यार्थिनीला कमरेपासून पायापर्यंत अपंगत्व आले. त्यामुळे तिचा शैक्षणिक प्रवास थांबला. शिक्षण हे वाघिणीचं दूध असल्याची महापुरुषाची शिकवण. शिक्षणाशिवाय प्रगतीचा पर्याय नाही. उज्वल भविष्याकरिता शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. बुद्धीच्या विकासाकरिता शिक्षण आवश्यक आहे. मात्र परिस्थितीमुळे अनेकांना शिक्षणात अडथळे येतात. कित्येकांचे शिक्षण परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकत नाही. श्रेया या विद्यार्थिनीच्या बाबतीतही हेच झाले. तिला शारीरिक अपंगत्व आलं , व तिचं शिक्षण थांबलं. जिद्द, चिकाटी व कर्तृत्व अंगी असतांना देखील विद्यार्थिनीला शिक्षण थांबाबवावं लागल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य व मदतगार म्हणून ओळखले जाणारे विजय चोरडिया यांना मिळाली. त्यांनी लगेच श्रेया हिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तिच्या कुटुंबियांना तिच्या शिक्षणासाठी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तात्काळ तिला वणी अर्बन निधी मार्फत संगणक व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. विजय चोरडिया यांनी श्रेया हीचा शैक्षणिक प्रवास सुकर केल्याने कुटुंबीयांचं मन भरून आलं. श्रेयाच्या कुटुंबीयांनी विजय चोरडिया यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. विजय चोरडिया यांनी गरजू गरिबांच्या मदतीचा विडा उचलल्याने जनतेलाही संकटकाळी मदतीला धावून येणारा एक हक्काचा दाता मिळाला आहे. 



No comments:

Powered by Blogger.