प्रशांत चंदनखेडे वणी
उकनी, पिंपळगाव तसेच वणी तालुक्यातील बहुतांश गावखेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता वणी येथील शाळा महाविद्यालयांमध्ये यावे लागते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून देण्यात न आल्याने त्यांना शाळा महाविद्यालयात जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. बस सुविधेअभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. गावखेड्यातुन शहरात शिक्षण घेण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाकडून बसेस सुरु करण्यात न आल्याने त्याचं शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करून देण्याकरीता मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता शाळेच्या वेळेवर बसेस सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उकनी, पिंपळगाव तसेच वणी तालुक्यातील आजूबाजूच्या गावातून असंख्य विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येतात. मात्र विद्यार्थ्यांकरिता शाळेच्या वेळेवर बसेस सुरु करण्यात न आल्याने त्यांना शाळा व महाविद्यालयांमध्ये जाणे येणे करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. ग्रामीण भागातून शाळेच्या वेळेवर बसेस सुरु नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. बस अभावी विद्यार्थ्यांचं शाळेत जाणं येणं कठीण झाल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य अंधकारमय होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातून शहरात शिक्षणाकरिता येणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी याआधीही मनसेच्या माध्यमातून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे (वणी आगार) वेळोवेळी पत्र व्यवहार देखील करण्यात आले. परंतु एसटी महामंडळाच्या (वणी आगार) अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. तेंव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे निर्माण होऊ नये, याकरिता त्यांच्या शाळेच्या वेळेवर बससेवा सुरु करण्याचे आदेश देण्याची मागणी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वणी आगार प्रमुखांशी बोलून १३ ऑगस्ट पर्यंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरु करावी. अन्यथा १६ ऑगस्ट पासून सर्व विध्यार्थी व पालकांना सोबत घेऊन उपोषणाला बसण्याचा इशाराही मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनातून दिला आहे.


No comments: