Latest News

Latest News
Loading...

शिवसेनेची (उबाठा) आढावा बैठक संपन्न, वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी केले मार्गदर्शन


प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेना पक्षात (उबाठा) प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तळागाळातील लोक शिवसेनेकडे वळू लागले आहेत. शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिवसागणिक शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. शिवसैनिकांची एकजूट करतांनाच त्यांची मोट बांधण्याचं महत्वपूर्ण काम संजय देरकर यांनी हाती घेतलं आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून पक्ष कार्याचा विस्तार करण्यावर संजय देरकर यांचा भर दिसून येत आहे. पक्ष बांधणी व पक्ष संघटन बळकट करण्याकरिता त्यांचा वणी विधानसभा क्षेत्रात झंझावात सुरु आहे. १८ ऑगस्टला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालयात संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना पक्ष कार्याचा विस्तार व पक्ष वाढविण्यासंदर्भात मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या अनुभवाचे बोल त्यांनी कार्यकर्त्यांपुढे मांडले. या बैठकीला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
शिवसेनेच्या या आढावा बैठकीत अनेकांचा शिवसेना पक्षात प्रवेश झाला. काँग्रेसचे माजी प. स. सदस्य डॉ. मधुकर आस्कर, कोलेरा पिंपरीचे उपसरपंच केशव पिदूरकर, कायरचे जेष्ठ शिवसैनिक भिमराव मंदावार यांनी शिवसेनेत जाहीररीत्या प्रवेश केला. संजय देरकर यांनी त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. संजय देरकर यांनी वणी विधानसभा प्रमुख पदाची धुरा सांभाळल्यापासून पक्षात कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढला आहे. या आढावा बैठकीत संजय देरकर यांच्याकडून शिवसैनिकांना महत्वाच्या टिप्स देण्यात आल्या. बैठकीला शिवसेनेचे (उबाठा) तालुका प्रमुख रवि बोढेकर, माजी उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, संजय देठे, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, डॉ. जगन जुनगरी, प्रशांत बलकी तथा शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

No comments:

Powered by Blogger.