प्रशांत चंदनखेडे वणी
वरोरा रेल्वे क्रॉसिंग पासून जवळच होम सिग्नल जवळ मालवाहू रेल्वेने वयोवृद्ध इसम कटल्याची घटना आज ९ ऑगस्टला सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, की त्याला रेल्वेची धडक बसली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. तसेच हा वृद्ध कुठला व त्याचे नाव काय, हे ही अद्याप कळू शकले नाही. तो अंदाजे ६० ते ६५ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या धडकेत सदर इसम हा गंभीर जखमी झाला असून त्याचा शरीरापासून हात कटला आहे.
माजरी वरून वणीकडे येत असलेल्या मालगाडीने एक वृद्ध इसम कटल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना वरोरा रेल्वे क्रॉसिंग पासून जवळच होम सिग्नल जवळ घडली. सदर इसमाला रेल्वेने धडक दिली, की या इसमाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र घटना घडल्यानंतर रेल्वे काही वेळ त्याच ठिकाणी थांबली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी जखमीला तातडीने रुग्णालयात हलविले. सदर इसम हा गंभीर जखमी झाला असून त्याचा शरीरापासून हात वेगळा झाला आहे. हा इसम कोण व कुठला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिस त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

No comments: