प्रशांत चंदनखेडे वणी
शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये जप्तीत असलेल्या दुचाक्यांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने १५ ऑगस्ट नंतर ३२ दुचाक्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या या दुचाक्या ज्यांच्या मालकीच्या आहेत त्यांनी १५ ऑगस्ट पूर्वी मोटारसायकलच्या मूळ कागदपत्रासह शिरपूर पोलिस स्टेशनला येऊन आपला मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन ठाणेदार माधव शिंदे यांनी केले आहे.
विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल अपिलाचा कालावधी पूर्ण होऊनही सोडविण्यात आल्या नाहीत. मोटार सायकल मालकांनी जप्तीतील मोटारसायकलवर अजूनही आपला मालकीहक्क सिद्ध केलेला नाही. तेंव्हा पोलिस स्टेशनला लावण्यात आलेल्या यादीवरील मोटारसायकलचा ताबा १५ ऑगस्ट पूर्वी न घेतल्यास त्यांचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. विविध कंपन्यांच्या ३२ मोटारसायकलची यादी गाडी नंबरसह शिरपूर पोलिस स्टेशनला लावण्यात आली आहे. तरी मोटारसायकल मालकांनी आपल्या गाडीचा नंबर पाहून मूळ कागदपत्रासह शिरपूर पोलिस स्टेशनला यावे, व आपली मोटार सायकल घेऊन जावी. अन्यथा न्यायालयाच्या आदेशावरून १५ ऑगस्ट नंतर या सर्व ३२ मोटारसायकलचा लिलाव करण्यात येणार असल्याचे ठाणेदार माधव शिंदे यांनी जाहीर केले आहे.

No comments: