भगवा सप्ताहात पक्ष प्रवेशाचा धडाका, राष्ट्रवादीचा माजी शहराध्यक्ष व उपसरपंचाच्याही मुलाचा शिवसेनेत प्रवेश
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा (उबाठा) भगवा सप्ताह सुरु आहे. ४ ऑगस्ट ते ११ पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात हा भगवा सप्ताह व जनसंवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हा संकल्प घेऊन संजय देरकर त्यांनी पक्ष बांधणी करण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यांनी दुरावलेल्या व सर्व आजी माजी शिवसैनिकांना एकत्र आणत पक्ष संघटन मजबूत करण्यावर जोर दिला आहे. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं प्राबल्य वाढविण्याची जबादारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या भगवा सप्ताहादरम्यान शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करून त्यांना सन्मान देण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष प्रवेश सोहळे घेण्यात आले. शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वणी विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाने देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पट्टाचारा, विठ्ठलवाडी व वासेकर ले - आऊट येथील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज वाकटी यांच्यासह पट्टाचारा व विठ्ठलवाडीतील अनेक युवकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश घेतला. यात विशाल सरोदे, बालाजी लांडगे, पराग येसनसुरे, अभिषेक तामिलवार, आकाश तामिलवार, संग्राम गेडाम, आशुतोष नागभीडकर, सोनू तिरणकर, सागर गोलाईत, शेख साबीर शेख अब्बास, हेमंत गावंडे, सुरज पदलमवार, कुंदन पेंदोर, प्रतिक गौरकार, संदेश तिखट, पंकज मसराम, तृणाल मोडक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.उपसरपंचाचा मुलगाही शिवसेनेत
उपसरपंच राहिलेले व आंबेडकरी विचारांचे कट्टर समर्थक तथा चळवळीत सक्रिय असलेल्या व्यक्तीचाही मुलगा शिवसेनेत गेला आहे. त्यानेही शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे वंचितांची मोट बांधणाऱ्या समविचारी पक्षांवर विचार करण्याची वेळ आली आहे. उपदेशाचे बाळकडू पाजताना घरचाच अहेर मिळू लागल्याने शोकांतिका निर्माण झाली आहे. पक्ष संघटना व वैचारिक संघटनाही तरुणांना संघटनेशी जोडून ठेवण्यात अपयशी ठरू लागल्या आहेत. त्यामुळे इतरांना पक्षात सामावून घेण्याच्या प्रयत्नात आपला तरुण इतरत्र जाऊ लागला, यावर कुठलच मंथन होतांना दिसत नाही. समविचारी पक्ष सैरभैर झाल्याने व समाजाची धुरा सांभाळणारे परावलंबी झाल्याने कार्यकर्ते दिशाहीन होऊ लागले आहे. आपली संघटन शक्ती दुबळी होत असतांना समविचारी पक्ष इतरांना पक्षात सामावून घेण्याचा गाजावाजा करू लागले आहे. तेंव्हा सर्वांचं मंगल करतांना आपलंच रान ओसाड होऊ नये, याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.



No comments: