प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील विठ्ठल-रुक्मीणी मंदीर येथे १ ऑगस्ट गुरुवारला घटस्थापना करण्यात आली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण असलेल्या विठ्ठल-रुख्मीणी मंदीर येथे श्रिकांत बडे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज भुषण व युवा उद्योजक मोरेश्वर उज्वलकर हे होते. त्यांनी कार्यक्रमात महत्वाची भुमिका बजावली.
या कार्यक्रमात संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधीचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल सन्मानित करण्यासाठी विशेष समारंभ घेण्यात आला. त्याचप्रमाणे या सांस्कृतिक विभागात भुसरी महाराजांचे कीर्तन-भजन सादर करण्यात आले. ज्यामुळे मेळाव्याचे आध्यात्मिक वातावरण समृद्ध झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंतलेश्वर तुरविले यांनी केले. सूत्रसंचालन मोरेश्वर उज्वलकर यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश किटे यांनी केले. यावेळी उपस्थितांना दहीहंडीचा काळ आणि महाप्रसादही देण्यात आला, ज्यामुळे उत्सवी वातावरणात भर पडली. मोरेश्वर उज्वळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून या कार्यक्रमाचे महत्त्व आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजावून सांगितला. बाळासाहेब राजूरकर यांनी नामदेव महाराजांबद्दल समाजाला प्रबोधन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अभय जुमळे, अनिल जुमळे, प्रभाकर उज्जवलकर, प्रभाकर ढाले, अशोक ढाले, मारोती देवगीरकर, वसंत कोहाळे, अरुण वाढई यांच्यासह विविध समुदायाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

No comments: