Latest News

Latest News
Loading...

वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी हरिष पाते यांची निवड, त्यांच्या प्रयत्नातून सुरु झाले पक्षाचे कार्यालय

प्रशांत चंदनखेडे वणी 

वंचित बहुजन आघाडी कडूनही पक्ष बांधणी व पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता पावले उचलण्यात आली असून  पक्ष वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहे. तालुकास्तरावर पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या युवकांचा शोध घेतला जात आहे. स्वतःचे हित न साधता पक्षाचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्ष संघटनेत निवड केली जात आहे. नुकतीच वंचित बहुजन आघाडीची वणी तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून हरीश दिगांबर पाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाच्या कार्याची धुरा सक्षमपणे वाहण्याचा संकल्प केला असून पक्ष वाढविण्याची त्यांची आत्मीयता दिसून येत हे. त्यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालयाजवळ वंचित बहुजन आघाडीचे जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकारिणीतील अन्य सदस्य व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

वंचित बहुजन आधाडीची नुकतीच वणी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. सर्वसमावेशक अशी ही कार्यकारणी असून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींची यात निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीची पक्षाकडून घोषणा करण्यात आली असून यात तालुकाध्यक्ष म्हणून हरिष दिगांबर पाते यांची निवड झाल्याने पक्षाला एक चळवळीचा कार्यकर्ता मिळाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यांवर झळकत आहे. अन्य कार्यकारणीमध्ये कार्याध्यक्ष प्रणिता ठमके, उपाध्यक्ष उत्तम सुदामा मडावी, अब्दुल गणी, नरेंद्र लोणारे, यशवंत पाटील, ओम परकार, शिवेंद्र ब्राह्मणकर, महासचिव आशिष पाझारे, डॉ. आनंद बेले, ऍड. अरुण सोयाम, संघटक बाळू लोणारे, किशोर गिरडकर, मनोज खैरे, सहसचिव संदेश भोयर, सचिन शोलेकर, अनिल रामटेके यांचा तर सदस्यांमध्ये चंदू भगत, विठ्ठल सातपुते, विनोद हिवरकर, प्रदीप मडावी, नंदकिशोर कुळसंगे, मिलिंद कांबळे, रंजना आत्राम, कल्पना सोयाम, नीलिमा कांबळे यांचा समावेश आहे. 

  

No comments:

Powered by Blogger.