प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दीना निमित्त शासकीय व प्रशासकीय कार्यालय तथा शाळा महाविद्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. कायर ग्रामपंचायत कार्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहन करण्याचा मान यावेळी सी.आर.पी. जवानाला देण्यात आला. सी.आर.पी. जवान अनिल इसारवार यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यलय प्रांगणात स्वातंत्र्य दीना निमित्त आयोजित कार्यक्रमात सरपंच नागेश धनकसार यांच्या हस्ते २३ दिव्यांगांना ५ टक्के निधी वितरित करण्यात आला. तसेच सी.आर.पी. जवान अनिल इसारवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, जी.प. शिक्षक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: