Latest News

Latest News
Loading...

खांदला ग्रामपंचायत येथे कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न, कास्तकारांना देण्यात आली महत्वपूर्ण माहिती


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खांदला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी कृषी विभागामार्फत हे शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक विस्तृत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाला कृषी सहाय्यक एम. आर. पत्रे, सरपंच हेमंत गौरकार हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सरपंच हेमंत गौरकार यांच्या हस्ते तीन शेतमजूरांना फवारणी किट वाटप करण्यात आली. 

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन करतांना सांगितले की, सन २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक पाहणी ऍप किंवा पोर्टलद्वारे ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पिक नोंदणी केली आहे. तेच शेतकरी ५००० हजार रुपये प्रती हेक्टर (२ हेक्टर मर्यादा असलेले) आर्थिक मदती करीता पात्र राहतील. खांदला व गोपालपूर (खां) येथील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची गावनिहाय व पीकनिहाय यादी ग्रामपंचायत कार्यालय येथे माहिती फलकावर लावण्यात आली आहे. तसेच गावात पुकारा घालून व शेतकरी ग्रुपवर सुद्धा ही माहिती पुरविण्यात आली आहे. 

पात्र लाभार्थी शेतकरी हे वैयक्तिक खातेदार असल्यास त्यांनी विहित प्रपत्रातील संमती पत्र व आधारकार्डची प्रत तथा सामाईक खातेदार असल्यास विहित प्रपत्रातील ना हरकत पत्र व सर्व सामाईक खातेदारांच्या आधारकार्डची प्रत अशी सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालय अथवा गावचे कृषी सहाय्यक यांच्याकडे सादर करावी. 

कृषी सहाय्यक एम.आर. पत्रे यांनी यावेळी कीटकनाशक खरेदी करतांना घ्यावयाची काळजी व फवारणी करतांना विषबाधा होऊ म्हणून घ्यावयाची दक्षता तथा विषबाधा झाल्यास प्राथमिक उपचाराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिराला ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. शिबिराच्या यस्वीतेकरिता सरपंच हेमंत गौरकार, उपसरपंच व सदस्यांनी सहकार्य केले. 

No comments:

Powered by Blogger.