प्रशांत चंदनखेडे वणी
भरधाव ट्रकने मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 15 ऑगस्टला दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील उमरी गावाजवळ घडली. सुफियान शेख युनूस कुरेशी (२२) रा. बेला जि. आदिलाबाद असे या अपघात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सय्यद इमरान सय्यद जाफर (३२) हा युवक या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
आदिलाबाद जिल्ह्यातील बेला गावचे रहिवासी असलेले हे दोघेही वणी येथे काही कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने (TS 01EM 7749) गावाकडे परतत असताना उमरी गावाजवळ मुकुटबन कडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (MH 29 BE 5634) या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकी चालक सूफियान शेख युनूस कुरेशी हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसून असलेला सय्यद इमरान सय्यद जाफर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. जखमीला उपचाराकरिता तर मृतदेह शवविच्छदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून ट्रक चालक हिरालाल कबीर झाडे (24) रा. गणेशपुर ता. वणी याच्यावर बिएनएसच्या कलम 281, 325,(ब), 106(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे


No comments: