मारेगाव येथे धर्मार्थ दवाखाना व व्यसनमुक्ती केंद्र सुरु, शिवसेना नेते संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव येथे धर्मार्थ दवाखाना व व्यसन मुक्ती केंद्र सुरु करण्यात आले आहे. कै. मारोतराव लक्ष्मण मेश्राम बहुउद्देशीय संस्था मारेगाव द्वारा संचालित या व्यसन मुक्ती केंद्राचा आज १६ ऑगस्टला उद्घाटन सोहळा पार पडला. शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते या व्यसन मुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. व्यसनांधतेकडे वळलेली युवा पिढी स्वतःचे भविष्य उद्धवस्त करू लागली आहे. युवावर्ग व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबाच्या चिंता वाढल्या आहेत. अति व्यसनामुळे अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. कित्येकांचे संसार या व्यसनाने उद्धवस्त केले आहेत. युवकांना या व्यसनापासून मुक्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे गावोगावी व्यसनमुक्ती केंद्र सुरु करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन डॉ. गजानन मेश्राम यांच्या सौजन्याने मारेगाव येथे धर्मार्थ दवाखाना व व्यसन मुक्ती केंद्र सुरु करण्यात आले आहे. या व्यसनमुक्ती केंद्राचा आज शुभारंभ करण्यात आला असून लोकनेते संजय देरकर यांच्या हातून हे उद्घाटनाचे कार्य पार पडले आहे.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. भास्कर महाकुलकर, जितू नगराळे, गजानन येरगुडे, लिलाधर मुरस्कर, विवेक गायकवाड, अक्ष आसुटकर, महेश सातपुते, अनिकेत कुचनकर, पाचभाई, दानखडे, विवेक भुजाडे, प्रविण बोबडे, धनराज नागपुरे आदी प्रमुख्याने उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्याकरिता या व्यसनमुक्ती केंद्राचा मोठा लाभ होणार असल्याचे विचार यावेळी संजय देरकर यांनी व्यक्त केले.


No comments: