Latest News

Latest News
Loading...

तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

प्रशांत चंदनखेडे वणी 

विनाकारण तरुणाशी वाद घालत त्याला लोखंडी रॉडने मारहान केल्याची घटना २ ऑगष्टला वासेकर ले-आऊट येथील कार्निवल बार जवळ घडली. याबाबत तरुणाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नरेश दिगांबर पाते (४०) रा. वासेकर ले-आऊट याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

स्वप्नील अरविंद चिंचोळकर (२४) हा वासेकर ले-आऊट येथे राहतो. १ ऑगष्टला तो निर्गुडा नदीच्या गणेशपूर पुलावर मासे पकडण्याकरिता गेला होता. त्यावेळी नरेश पाते याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु होता. नंतर स्वप्नील हा तेथून घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी स्वप्नील आपल्या मोटारसायकलने कार्निवल बारजवळून घराकडे जात असतांना नरेश पाते याने त्याला रस्त्यात अडविले. तू काल तेथे काय करत होता, तू दादागिरी करू लागला काय, असे म्हणत त्याने घरून लोखंडी रॉड आणून स्वप्नीलवर हल्ला चढविला. लोखंडी रॉड त्याने स्वप्निलच्या डोक्यावर मारण्याकरिता उगारला असता स्वप्नील याने त्याचा वार हाताने रोखला. मात्र दुसरा वार त्याने मांडीवर केल्याने स्वप्नील याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर २ ऑगष्टला नरेश दिगांबर पाते याच्या विरुद्ध पोलिस सेटशनला तक्रार नोंदविली. स्वप्निल चिंचोळकर याच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी नरेश पाते याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.