१५ ऑगस्स्ट १९४७ साली भारतीयांची इंग्रजांच्या गुलामीतून मुक्तता झाली. स्वातंत्र्यासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीमुळे देश स्वातंत्र्य झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. थोर पुरुषांनी जीवाची बाजी लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते. भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कायम होते. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली. आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला. मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळी नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. अथक प्रयत्न व संघर्षानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याची ज्योत हृदयात तेवत ठेऊया. चला सर्व मिळून स्वातंत्र्य दिन साजरा करूया.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा ! HAPPY INDIPENDENCE DAY...
शुभेच्छुक:-
ग्रामपंचायत वागदरा









No comments: