Latest News

Latest News
Loading...

मनसेच्या बेमुद्दत रस्ता रोकोच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग, प्रशासनाने पाऊले उचल्याने उद्याचे आंदोलन स्थगित

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलि कडून २२ कोटी रुपयांचा निधी मिळुनही शिंदोला-मुंगोली मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात न आल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी १५ ऑगस्ट पासून बेमुद्दत रस्ता रोको आंदोलन करण्याचा व वेकोलिची कोळसा वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला होता. मनसेच्या आंदोलनाच्या दणक्याने वेकोलि प्रशासन व शहर प्रशासन खडबडून जागे झाले. त्वरित पावले उचलत या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा करण्याचे आश्वासन देऊन रस्ता ओलाचिंब होईपर्यंत पाण्याची फवारणी करण्यात आली. यानंतर नेहमी हा रस्ता असाच ओला राहील तेंव्हाच कोळशाची वाहतूक करण्यात येणार असल्याचे वेकोलि अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. वेकोलि कडून निधी मिळाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे कंत्राट देण्यात आले. कार्यादेशही देण्यात आला. मात्र सहा महिने लोटूनही कामाला सुरुवात न झाल्याने मनसे आक्रमक झाली. तालूकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे जाहीर करताच प्रशासनाने वेगवान हालचाली सुरु केल्या. रस्त्याच्या दुरुस्तीकरणाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. वेकोलि कडून रस्ता ओलाचिंब होईपर्यंत पाण्याची फवारणी करण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्य दीना पासून करण्यात येणारे बेमुद्दत आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याचे फाल्गुन गोहोकार यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलतांना सांगितले. 





No comments:

Powered by Blogger.