प्रशांत चंदनखेडे वणी
प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भारतासह संपूर्ण विश्वात प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली असतांना देखील नांदेपेरा ग्रामपंचायतीने प्लास्टिकच्या कारखान्याला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे कारखाना सुरु असतांना या कारखान्याच्या आजूबाजूला पडून असलेल्या प्लास्टिकची विल्हेवाट न लावता कारखाना सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. कारखान्याबाहेर पडून असलेला प्लास्टिकचा कचरा हवेने उडून रस्त्यावर व नाल्यांमध्ये साचत असून या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे नाल्यांचे पाईप जाम होऊ लागले आहेत. वाहत्या पाण्यामुळे हे प्लास्टिक आता शेतात साचू लागले आहे. प्लास्टिकमुळे मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता गावातील कारखान्याबाहेर पडून असलेला प्लास्टिकचा कचरा तात्काळ तेथून उचलण्याची मागणी नादेपेरा गाववासीयांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नांदेपेरा गावातील प्लास्टिकच्या कारखान्याबाहेर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा झालेला आहे. कित्येक दिवसांपासून ग्रामपंचायतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावलेली नाही. प्लास्टिकच्या या कचऱ्यामुळे आता गावात अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गावातील पाळीव जनावरे हे प्लास्टिक खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मानवी जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. परवारणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतातही हे प्लास्टिक साचून राहत असल्याने शेतीवरही त्याचा परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. २० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर शासनाने बंदी आणली असतांना देखील ग्रामपंचायतीने गावात प्लास्टिक कारखान्याला परवानगी देऊन मानवी जीवन व पर्यावरण धोक्यात आणले आहे. कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होऊन असतांना देखील कारखाना सुरु करण्याला परवानगी देण्यात आली. कारखान्याबाहेर जमा होऊन असलेले प्लास्टिक जिकडे तिकडॆ विखुरल्याने गाववासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. प्लास्टिकमुळे गावातील नाल्या तुंबल्या असून पाईप लाईन चोकअप होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे गावात मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कारखान्याच्या आजूबाजूला जमा होऊन असलेल्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्यांमुळे मानव, प्राणी व पर्यावरणाला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ग्रामपंचायतीने त्वरित या प्लास्टिकरूपी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची तथा कारखान्याला परवानगी देतांना ग्रामसभेत तसा ठराव घेण्याची मागणी नांदेपेरा ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर सुरेश शेंडे, राजू डोंगे, निळकंठ डोंगे, शंकर ठोंबरे, एकनाथ मेश्राम, विनोद डोंगे, गोपाल डोंगे, संदीप ठेंगणे, प्रदीप ठेंगणे, रविंद्र चहानकर, मंगेश ठेंगणे, वामन दुमोरे, संतोष रामटेके, भाऊराव भोगे, शुभम धोटे, अजय किनेकर, राजू चहानकर, गजानन वरारकर, गजानन खोंडे, सुरेश चहानकर, प्रभाकर चहानकर, पुरुषोत्तम वरेरकर यांच्यासह ३९ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments: