Latest News

Latest News
Loading...

मनोरंजन क्लबमध्ये गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, जन्मदिनीच त्याने मृत्यूला कवटाळले

प्रशांत चंदनखेडे वणी 

नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सतत होणाऱ्या आत्महत्यांमुळे चिंता निर्माण केली आहे. मारेगाव येथील एका युवकाने मनोरंजन क्लबमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. १ सप्टेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नविन मोतीगिरी बामणे (३५) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. नविन हा मनोरंजन क्लबमध्येच काम करायचा. दुपारी तो क्लब मधील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नविन बामणे याचा १ सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवशीच त्याने आत्मघात केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याने असा हा टोकाचा निर्णय का घेतला हे मात्र अद्याप कळू शकले नाही.

नविन बामणे हा मूळचा मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथील रहिवाशी होता. एक महिन्याआधीच तो मारेगाव येथे राहायला आला. मारेगाव येथे परिवारासह राहत असलेला नविन हा मारेगाव शहरातीलच एका मनोरंजन क्लबमध्ये काम करायचा. रविवारी मनोरंजन क्लबमध्येच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दोन वाजता तो मनोरंजन क्लब मधील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. नविन याचा १ सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवशीच त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला. जन्मदिनीच त्याने मृत्यूला कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याने मृत्यूचा फास गळ्याभोवती का आवळला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नविन बामणे याच्या पश्च्यात आई, पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा आप्त आहे. पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.