प्रशांत चंदनखेडे वणी
शनिवारी वणी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भा नदीला प्रचंड पुर आला. पुराचे पाणी नदीच्या पुलावरून वाहू लागले. पुलावरून पाणी वाहत अस्तांना एका ट्रक चालकाने जोखीम पत्करून पुल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा व रस्त्याचा अंदाज न असल्याने ट्रक नदीपात्रात कोसळला. यात ट्रक चालक हा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवार दि. 31 ऑगस्टला दुपारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनस्थळ गाठले. मात्र नदीला आलेल्या पुरामुळे ट्रक चालकाचा शोध घेणे कठीण झाल्याने याबाबत एनडीआरएफ पथकाशी संपर्क साधण्यात आला. पथकाकडून नदी पात्रात शोध मोहीम राबविण्यात आली असून ट्रक चालकाचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. मात्र ट्रक चालक अद्याप कुठेही आढळून आला नाही. परंतु नदीत कोसळलेला ट्रक मात्र पोलिसांनी नदी बाहेर काढला आहे. रमाकांत वसंतराव शास्त्रकार वय अंदाजे 45 वर्षे रा. स्टेट बँक जवळ वणी असे या नदीच्या पुरात वाहून गेलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
वणी मुकुटबन मार्गावरील नेरड पुरड गावाजवळून वाहणाऱ्या विदर्भा नदीला शनिवारी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आला. नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने पुल अदृश्य झाला होता. पुल पूर्णपणे पाण्यात बुडाल्याने रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले होते. पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना रमाकांत शास्त्रकार या ट्रक चालकाने जोखीम पत्करून पुल पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा व रस्त्याचा अंदाज न आल्याने 18 चाकी ट्रक नदीत कोसळला. यात ट्रक चालक हा पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही. पूर आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्याचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे. मुकुटबन येथील आर.सी.सी.पी.एल. सिमेंट कंपनीत माल वाहतूक करणारा हा ट्रक मुकुटबन वरून वणीला येत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान मार्गात असलेल्या विदर्भा नदीला पूर आला व पुराचे पाणी पुलावरून वाहु लागले. अशातच ट्रक चालकाने पुल पार करण्याचा प्रयत्न केला. आणि ही दुर्दैवी घटना घडली. नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या रमाकांत शास्त्रकार या ट्रक चालकाचा बचाव पथकाकडून युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे.

No comments: