प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील कायर येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत भारत सरकार पोस्ट ऑफिस द्वारा 31 ऑगस्टला सकाळी 8.30 वाजता “डाक चौपाल“ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मुस्तफा शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे, पोस्ट ऑफिसचे अधिकारी अशोक मुंढे, केंद्र प्रमुख राजेश खुसपुरे, सहायक शिक्षक कवडू जीवने, पोलीस पाटील मनोज अडेलवार, निलेश मंथनवार, माजी सरपंच नितीन दखणे, अविनाश उमाटे, बोकडे, गजानन चोपडे, अंकुश बोरकुडे, पोस्ट मास्टर प्रवीण पेटकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक यवतमाळ जिल्हा पोस्ट ऑफिसचे अधिकारी अशोक मुंढे यांनी स्वतंत्र पूर्व काळातील डाक विभाग ही भारत सरकारची सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणारी यंत्रणा उत्तरोत्तर कशी नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणारी सेवा प्रदान यंत्रणा ठरली याबाबत विस्तृत मार्गदर्शन करतांनाच त्यांनी डाक विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध योजनांची (पोस्ट सेविंग, आर डी, सुकन्या योजना, टपाल विमा) माहिती दिली. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांसाठी आधार बेस खाते व शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचविणारी भारत सरकारची उत्तम सुविधा म्हणजे डाक विभाग यंत्रणा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवडू जीवने यांनी केले. यावेळी मुस्तफा शेख व सुरेंद्र इखारे यांनी देखील आपापले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर मडावी यांनी तर आभार प्रदर्शन गजानन चोपडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कुमुदिनी देवतळे, विना आरोडा, रविकांत गोंडलावार, कीर्ती कुलकर्णी, सोनाली भोयर, रंजना तुपे, मधुकर घोडमारे, सोनाली टोंगे, श्रुतिका फटाले, राहुल विरुळकर, विलास ढेंगळे, गजानन आसुटकर ,प्रयास कुमरे, खुशाल महारतळे, कांचन पुडके, गणेश नेहारे, आकांक्षा, रफिक सैय्यद यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष तथा दोन्ही शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कायर पोस्ट ऑफिस तर्फे बिस्किटाचे वाटप करण्यात आले.

No comments: