प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा वणी विधानसभा क्षेत्रातील प्रख्यात सामाज पुढारी, दानशूर व्यक्तिमत्व व प्रतिष्ठित व्यापारी विजयबाबू चोरडिया यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे विजयबाबू एक कुशल व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास आले आहेत. समाजमन जपणारे व समाज मनात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे विजयबाबू चोरडिया यांच्या समाजकार्याची व्याप्ती फार मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्याची धुरा वाहणारे विजयबाबू हे सर्वसामान्यांचे काळजीवाहू व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले आहेत. दिन दुःखितांचे दुःख वेचणारे व त्यांच्या दुःखांवर मायेची फुंकर घालणारे विजयबाबू समाजातील प्रत्येक घटकाच्या कठीण परिस्थितीत त्यांचा आधार बनले आहेत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. गोरगरीब व गरजूंना सढळ हाताने मदत करणाऱ्या विजयबाबू यांच्या हातून सदासर्वदा मदतीचा ओघ वाहिला आहे. धार्मिक कार्यातही त्यांनी तन, मन, धनाने मदत केली आहे. धार्मिक कार्यातील योगदानात ते नेहमी एक पाऊल पुढे राहीले आहेत. राजकारणातही ते तेवढेच अग्रेसर आहेत. समाजधुरणी म्हणून त्यांना या क्षेत्रात मानाचं स्थान आहे. गरजवंतांची गरज भागविण्याचं सौख्य आजही त्यांच्या हातून घडत आहे. त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडचणीही त्यांनी दूर केल्या आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्य पुरवलं आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं तर ते परमधर्म मानतात. लुळ्यापांगळ्यांना कृत्रिम अवयव तर नेत्र रुग्णांच्या जीवनातील अंधःकार दूर करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं आहे. अनेकांच्या गंभीर आजारारांवर त्यांनी स्वखर्चाने उपचार केले आहेत. कित्येकांचे ऑपरेशन त्यांनी स्वखर्चाने केले आहे. खेळाडूंच्या उत्थानासाठीही त्यांचं भरीव योगदान राहीलं आहे. क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा म्हणून त्यांनी वेळोवेळी आर्थिक मदत करतांनाच क्रिकेटच्या भव्य अशा स्पर्धाही घेतल्या आहेत. असा हा जनतेप्रती आस्था जोपासणारा आणि जनसेवेसाठी आपलं आयुष्य वेचणारा समाजधुरणी व दातृत्वाचा धनी विजयबाबू चोरडिया यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
शुभेच्छुक :- स्माईल फाउंडेशन, वणी उपविभागातील अग्रण्य स्वयंसेवी संस्था (एनजीओ,NGO) अध्यक्ष :- सागर जाधव, उपाध्यक्ष :- पियुष आत्राम, सचिव :- आदर्श दाढे, सदस्य :-विश्वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, सचिन जाधव, कार्तिक पिदूरकर, जगदीश गिरी, कुणाल आत्राम, निकेश खाडे, प्रसाद पिपराडे, गौरव कोरडे, तुषार वैद्य, सचिन भोयर, सचिन काळे, मयूर भरटकर, रोहित ओझा, शुभम गाडगे, भूषण पारवे, दिनेश साखरकर, शुभम भेले, महेश खामनकर



No comments: