Latest News

Latest News
Loading...

पोळ्याच्या सणालाच युवा शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट

प्रशांत चंदनखेडे वणी 

शेतकऱ्यांचा परंपरागत सन बैल पोळा हा सर्वत्र साजरा होत असतांना तान्हा पोळ्याच्या दिवशीच एका युवा शेतकऱ्याने विषाचा घोट घेतला. वैफल्यग्रस्त मानसिकतेतून या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. तालुक्यात सर्वत्र तान्हा पोळा हा सन साजरा केला जात असतांना या शेतकऱ्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जगाचा निरोप घेतला. मानसिक विवंचनेतून मृत्यूला कवटाळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच शेतकऱ्यांवर ओढवणारे संकट व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी टोकाचे निर्णय घेऊ लागले आहेत. पठारपूर येथे वास्तव्यास असलेल्या युवा शेतकऱ्याने जीवनात आलेल्या नैराश्येतून विषारी द्रव्य प्राशन केले. ही घटना ३ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुनिल भाऊराव उलमाले वय अंदाजे ४२ वर्षे असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 

तालुक्यातील पठारपूर येथे कुटुंबासह राहत असलेल्या सुनिल उलमाले या युवा शेतकऱ्याने तान्हा पोळ्याच्या दिवशीच आत्मघात केला. मानसिक विवंचनेतून त्याने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून मृत्याला कवटाळले. सुनिलने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. सुनिल उलमाले याला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

सुनिल उलमाले हा अल्पभूधारक शेतकरी होता. वडिलोपार्जित ३ एकर शेती वाहून तो आपला प्रपंच चालवायचा. त्यातच निसर्गाचा लहरीपणा शेतीला बाधक ठरू लागला. अशातच मानसिक विवंचनेतून त्याने आत्मघाती निर्णय घेतला. त्याने असा हा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकरी बांधवांच्या महत्वाच्या सनालाच त्याने विषाचा घोट घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सुनिल उलमले याच्या पश्च्यात आई, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. सततच्या आत्महत्यांमुळे चिंता वाढली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. सुनिल उलमाले याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.