प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी २५ ऑगस्टला पायदळ आपल्या घराकडे जात असतांना तिच्याच वर्गातील विद्यार्थ्यांनी तिची छेड काढली. त्यानंतर त्यांनी परत २ सप्टेंबरला तिची छेडछाड केली. सतत भररस्त्यात ही मुलं छेड काढीत असल्याने अपमानीत झालेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीच्या पालकांनी छेड काढणाऱ्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांची मुले गैरवर्तन करू लागल्याचे त्यांना सांगितले. मात्र मुलाच्या पालकांनी मुलांचीच बाजू घेत मुलीच्या पालकालाच शिवीगाळ केली. त्यामुळे शेवटी ४ सप्टेंबरला मुलीच्या पालकाने मुलीची छेड काढणाऱ्या तरुणांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या एका २३ वर्षीय मित्रावर बीएनएसच्या कलम ७८, ३५२, ३५१ (२), ३५१(३), ३५१(५), व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.


No comments: