प्रशांत चंदनखेडे वणी
घरकुलाचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठीचा दुसरा हप्ता अद्यापही मिळाला नसल्याने त्यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. घरकुलाचा लाभ मिळुनही घराचे बांधकाम पूर्ण होऊ न शकल्याने लाभार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या रमाई व प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचा केवळ पहिलाच हप्ता मिळाला आहे. मात्र दीर्घ कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा हप्ता अद्याप मिळाला नाही. त्यामुळे त्यांचे घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. घरकुलाचा दुसरा हप्ता थकल्याने लाभार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. फाल्गुन गोहोकार यांनी घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न उचलून धरत त्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन घरकुलाचा थकलेला दुसरा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली. येत्या १० दिवसांत घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठीचे उर्वरित अनुदान न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनातून दिला आहे.
गोरगरिबांना हक्काचे घर बांधता यावे म्हणून शासनाकडून घरकुलाच्या विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा केवळ पहिलाच हप्ता मिळाला असून दीर्घ कालावधी लोटूनही त्यांना अद्याप घरकुलाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. अनुदानाअभावी घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले असल्याने लाभार्थ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. घरकुल योजनेचा दुसरा हप्ता थकल्याने लाभार्थ्यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. फाल्गुन गोहोकार यांनी गोरगरीब लाभार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेत त्यांच्या सोबत पंचायत समिती कार्यालय गाठले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली. घरकुल बांधकामासाठीचे उर्वरित अनुदान १० दिवसांत न देण्यात आल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना फाल्गुन गोहोकार यांच्यासह धिरज पिदूरकर, राकेश शंकावर, शंकर बोरगालमवार, विनोद कुचानकर, रणजित बोन्डे, कैलास निखाडे, सुरज काकडे, योगेश काळे, प्रवीण कळस्कर, प्रवीण मांडवकर, धिरज बगवा, गौरव बोबडे, जनार्धन खामणकर, अमर पाचभाई, प्रदीप वाढई, गणेश उकीणकर, अमोल पाल, गजानन बोन्डे, अमोल जेऊरकर तथा घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: