Latest News

Latest News
Loading...

(BREAKING NEWS) अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या नराधमावर पोक्सो व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीचे सतत ५ महिने शारीरिक शोषण करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमाविरुद्ध मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला विविध प्रलोभन व आमिषे दाखवून या नराधमाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिला गावाबाहेर निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार करणाऱ्या या नराधमाविरुद्ध पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत दिलीप उराडे (३३) असे या अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. 

वणी मुकुटबन मार्गावर असलेल्या एका गावातील १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर त्याच गावात राहणाऱ्या एका युवकाची वासनांध नजर पडली. नंतर तो तिच्याशी जवळीक साधण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा शोधू लागला. तिच्या कुटुंबासोबत त्याने घरगुती संबंध वाढविले. कुठल्या ना कुठल्या कारणाने तो तिच्या घरी येऊ लागला. कालांतराने त्याचे मुलीच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध निर्माण झाले. त्याने कुटुंबीयांचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यांची अडली नडली कामेही तो करून द्यायचा. नंतर त्याने या अलपवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरु केला. तिला स्वतःकडे आकर्षित करण्याकरीता त्यांने विविध शकली लढविल्या. तिची महाविद्यालयीन व इतरही कामे तो करून द्यायचा. नंतर त्याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिला विविध प्रलोभने व आमिषे दाखविली. तिला भूलथापा देऊन पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकविल्यानंतर त्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

नंतर त्याने तिला सतत आपल्या वासनेची शिकार केले. तिला कधी लग्नाचे आमिष दाखवून तर कधी कुठली भीती दाखवून त्याने तिचं सतत ५ महिने शारीरिक शोषण केलं. नंतर तिला गर्भधारणा झाल्याने त्याचे बिंग फुटले. मुलीने नंतर सर्व आपबिती वडिलांना सांगितली. वडिलांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठत रीतसर तक्रार नोंदविली. १ फेब्रुवारी ते ११ जुलै पर्यंत कधी गावात, कधी निलगिरी वनात तर कधी निर्जनस्थळी नेऊन या नराधमाने अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार केला. अशा प्रकारची वडिलांनी तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी प्रशांत उराडे याच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम 64, 64(2)(i), 64(2)(M), 351(2)(3) तथा पोक्सो व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात विजय वानखेडे, अमोल मुन्नेलवार, प्रदीप ठाकरे करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.