(BREAKING NEWS) दरोड्याच्या प्रयत्नातील दोन संशयित लागले पोलिसांच्या हाती, दोघांनाही जालना येथून घेतले ताब्यात
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या प्रगती नगर येथील एका राहत्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबातील मुलीच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा दरोड्याचा डाव उधळला गेला. त्यानंतर पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून दोन संशयितांना जालना येथून ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच दरोडा टाकण्याकरिता वापरण्यात आलेली संशयित कारही पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आली. त्यांनी ती कार देखील जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री ५ ते ६ दरोडेखोरांनी सुभाष डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या मुलीच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला होता. मुलीने प्रसंगावधान राखल्याने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. मात्र दरोडेखोरांनी दाट लोकवस्तीत दरोडा टाकण्याच्या केलेल्या धाडसी प्रयत्नामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. एका नामांकित व्यावसायिकाच्या घरी दरोड्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांवर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा दबाव वाढला होता. तसेच सातत्याने घडत असलेल्या या गंभीर घटनांमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे पोलिसांनी आपली सर्व तपास यंत्रणा कामाला लावली. आपले तपास कौशल्य पणाला लावून अवघ्या काही तासांतच पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोन संशयितांच्या चौकशीतुन अन्य आरोपी गवसण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचीही माहिती मिळविण्याचा पोलिसांकडून हरसंभव प्रयत्न केला जात आहे. उर्वरित आरोपीही लवकरच गजाआड दिसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
प्रगती नगर येथे कुटुंबासह राहत असलेल्या सुभाष डोर्लीकर यांच्या दुमजली इमारतीत ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोर शिरले. त्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तळमजल्यावरील खोलीतील सामान त्यांनी अस्ताव्यस्त फेकले. मात्र तेथे त्यांच्या काहीच हाती न लागल्याने त्यांनी वरच्या माळ्यावरील बेडरूमकडे आपला मोर्चा वळविला. वरच्या माळ्यावर सुभाष डोर्लीकर यांची मुलगी झोपली होती. दरोडेखोरांच्या आदळआपट करण्याने मुलगी झोपेतून खडबडून जागी झाली. तिला घरात कुणी तरी शिरल्याचा संशय आल्याने तिने जोरजोरात आरडाओरड केली. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून धूम ठोकली. मुलीने समयसूचकता दाखवून दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न हणून पाडला. मुलीच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. मुलीने आरडाओरड केल्याने दरोडेखोर मागच्या दारानेच पळत सुटले. आलिशान कारमधून आलेल्या या दरोडेखोरांनी आपली ओळख पटू नये म्हणून चक्क हेलमेट लावले होते. त्यामुळे पोलिसांसमोर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. कारमधून पसार झालेल्या या दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता.
पोलिसांनी आपली सर्व तपास यंत्रणा कामी लावली. खबऱ्यांनाही अलर्ट केले. सर्वच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आपलं तपास कौशल्य पणाला लावून आणि तपासाची योग्य दिशा पकडून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच (६ सप्टेंबर) दोन संशयितांना जालना येथून ताब्यात घेतले. जालना पोलिसांच्या मदतीने या दोनही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन वणी पोलिस स्टेशनला आणले जात आहे. या संशयित आरोपींच्या चौकशीतून लवकरच या घटनेचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या कडून त्यांच्या साथीदारांचीही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अन्य दरोडेखोरही लवकरच गजाआड दिसणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दाखविलेल्या तपास कौशल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल बेहेरानी व पोलिस पथक करीत आहे.

No comments: