टाकळी कुंभा येथील पक्ष प्रवेशाने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष, गावातील बहुतांश नागरिकांनी केला शिवसेनेत (उबाठा) प्रवेश
प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील ग्रामस्थांनी शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला. ५ सप्टेंबरला टाकळी (कुंभा) या गावात भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी युवावर्गासह महिला, पुरुष व गावातील बहुतांश नागरिकांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेशी नाळ जोडली. संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गावातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. संजय देरकर यांनी कार्यकर्ता जोडो मोहीम हाती घेतली असून गावागावातील कार्यकर्त्यांना ते पक्षाशी जोडू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वात वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु असून कार्यकर्त्यांची शिवसेनेत इनकमिंग वाढली आहे. कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढत असलेला कल ही संजय देरकर यांच्या कुशल नेतृत्वाची पावती आहे. वणी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत तसेच गावागावात सभा घेऊन त्यांनी शिवसेनेचं कार्य लोकांपर्यंत पोहचविलं आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना पक्षाशी जोडलं आहे. त्यांच्या नेतृत्वात शहरांसह गावागावात भव्य पक्ष प्रवेश सोहळे आयोजित करण्यात आले असून त्यांचं नेतृत्व स्वीकारून असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत.
शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त शिवसेनेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. पक्ष बांधणी व पक्ष संघटन बळकट करण्याचाही या सप्ताहातून संकल्प करण्यात आला. वणी विधानसभा क्षेत्रात पक्षबळ वाढविण्याकरिता शिवसेनेकडून गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी गावागावात शिवसेना पोहचविण्यावर भर दिला आहे. गावागावात बैठका घेऊन ते कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करीत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात पक्ष वाढविण्याची त्यांची तळमळ दिसून येत आहे. शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व निष्ठावंतांची एकजूट करीत त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाची मोट बांधली आहे. कार्यकर्तेही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन एकजूट होऊ लागले आहेत. ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे घेतले जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यांतून अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ५ सप्टेंबरला टाकळी (कुंभा) या गावात संजय देरकर यांच्या नेतृत्वात भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. या पक्ष प्रवेश सोहळ्यात गावातील बहुतांश नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गावातील तरुण, तरुणी, युवक, युवती तथा जेष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने शिवसेनेत दाखल झाले. राजकीय लक्ष वेधणारा असा हा पक्ष प्रवेश सोहळा ठरला. ग्रामस्थांचीही या पक्ष प्रवेश सोहळ्याला लक्षणीय उपस्थिती लाभली.
यावेळी सरपंच प्रणीला आदेवार यांच्यासह पुरुषोत्तम डाहुले, मोरेश्वर राऊत, दिनेश डाखरे, छत्रपती डाहुले, दीलीपराव काकडे, गुलाबराव ठोंबरे, देविदास काकडे, गौतम पोंगळे, बिजाराम मंगाम, राजू आदेवार, सुनील सराटे, भालचंद्र गेडाम, अरविंद डाहुले, शंकर देशमुख, कल येवले, गणेश परचाके, प्रवीण सोनटक्के, देवेंद्र देवतळे, अशोक डाहुले, गिरमाजी क्षीरसागर, अर्चना निवलकर, सुवर्णा डाहुले, संगीता काकडे, शालिनी ठावरी, कल्पना जुमनाके, अश्विनी झाडे, जया पाल, सुप्रिया मडावी, उषा सोनटक्के, किरण मडावी, कविता क्षीरसागर, भद्रा सिडाम, दर्शना चौधरी, कौसाबाई काकडे, रत्नमाला शेळके, पुष्पाबाई कुडमेथे, बेबीबाई चौधरी, वंदना सीडाम तथा गावातील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे गणपत लेडांगे, किरण देरकर, दीपक कोकास, मस्की, प्रशांत बलकी, विवेक ठाकरे, राजेंद्र ईद्दे, डॉ. जगन जुनगरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या पक्ष प्रवेश सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.



No comments: