प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक पुढारी व प्रतिष्ठित व्यापारी विजय चोरडिया यांचा वाढीदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अभिष्टचिंतन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी विविध राजकीय, सामाजिक तथा धार्मिक संघटनांनी वणी विधानसभा क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या विजय चोरडिया यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समाजशील व्यक्तिमत्व म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्याकरिता त्यांच्या प्रियजनांनी गर्दी केली होती. धार्मिक संस्था व समित्यांनी देखील विजय चोरडिया यांचा वाढीदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ठिकठिकाणी सत्कारही करण्यात आला. सकाळी ६.३० वाजता श्री रंगनाथ स्वामी मंदिरात त्यांच्या हस्ते पूजा व अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर खाटू श्याम मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विजय चोरडिया यांनी या मंदिराला ४ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली होती. जैताई देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीच्या वतीनेही विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांचं स्वागत व सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवस्थान समिती कडून मंगलकामना करण्यात आली. यावेळी जैताई देवस्थान कमिटी व अन्नछत्र समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर वणी अर्बन निधीचे संचालक व कर्मचाऱ्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. सद्गुरू बाजीराव महाराज वृद्धाश्रमात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. कायर येथे विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच नागेश धनकसार यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली. तसेच गावातील अनाथ व दिव्यांगांना धान्य किट वितरित करण्यात आल्या. यावेळी कायर ग्रामस्थांनी विजय चोरडिया यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी ६ वाजता शहरातील गोकुळ नगर येथे विजय चोरडिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता श्री विनायक मंगलकार्यालय येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक महिला, पुरुष व युवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचं हंसराज अहिर व संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पक्षात स्वागत केलं. यावेळी विजय चोरडिया यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचाली करीता भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments: