Latest News

Latest News
Loading...

पार्किंगच्या समस्येवरून युवासेनेकडून करण्यात येणारं आंदोलन तूर्तास स्थगित

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील बहुतांश सरकारी बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांना पार्किंग व्यवस्था नसल्याचा मुद्दा उपस्थित करून आंदोलनाची भूमिका घेतलेल्या युवासेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी नगर पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर १० ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र २४ नोव्हेंबर पर्यंत बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांनी ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था न केल्यास युवासेना तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजिंक्य शेंडे यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला आहे. 

शहरातील बहुतांश सरकारी बँक, सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्था या प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवर आहेत. त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने येथे येणारे ग्राहक रस्त्यांवर आडव्या तिडव्या मोटारसायकल लावून तासंतास बँकेचे व्यवहार करतात. बँकांसमोर नियबाह्य पद्धतीने मोटारसायकल उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होऊन नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे रहदारीला निर्माण होणारे अडथळे लक्षात घेता बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांनी ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी अजिंक्य शेंडे यांनी केली होती. याबाबत त्यांनी नगर पालिका प्रशासनाला निवेदन देऊन पार्किंग व्यवस्था नसलेल्या बँक, पतसंस्था व मल्टीस्टेट वित्तीय संस्थांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याची देखील मागणी केली होती. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र नगर पालिका प्रशासनाने अजिंक्य शेंडे यांच्या मागणीची दखल घेऊन सरकारी बँक व पतसंस्थांना याबाबत सूचना जारी केल्या आहेत. बँक व पतसंस्थांच्या व्यवस्थापकांना पार्किंगच्या प्रश्नावर चर्चा करण्याबाबत पत्र देण्यात आल्याचे नगर पालिका प्रशासनाने अजिंक्य शेंडे यांना कळविल्याने आजचं आंदोलन स्थगित करण्यात आलं असल्याचे अजिंक्य शेंडे यांनी सांगितले आहे. मात्र २४ नोव्हेंबर पर्यंत पार्किंगचा प्रश्न न सुटल्यास युवासेना तीव्र आंदोलन केल्याशिवार राहणार नसल्याचा इशारा युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी नगर पालिकेला दिला आहे. 


No comments:

Powered by Blogger.