Latest News

Latest News
Loading...

शिवसेनेत (उबाठा) कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरूच, वागदरा येथील युवकांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रशांत चंदनखेडे वणी 

शिवसेनेच्या (उबाठा) गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक या अभियानातंर्गत कार्यकर्त्यांना शिवसेनेशी जोडण्याचं कार्य हाती घेण्यात आलं असून शिवसेनेचे (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात हे कार्य अविरत सुरु आहे. संजय देरकर यांच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते शिवसेनेशी जुळले आहेत. त्यांच्या नेतृत्वात गाव शहरात भव्य पक्ष प्रवेश सोहळे घेण्यात आले. नागरिकांचाही या पक्ष प्रवेश सोहळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल होत आहेत. गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते तयार झाले आहेत. संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले आहे. नुकताच वागदरा येथे त्यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. यात अनेक  युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन गावातील अनेक युवकांनी त्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. 

संजय देरकर यांनी पक्ष बांधणी व पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना संघटित करण्याचं काम केलं. विखुरलेल्या कार्यकर्त्यांचीही त्यांनी जुळवाजुळव केली. निष्ठावंत शिवसैनिक परत एकसंघ झाले आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला बळकटी देण्याचं महत्वपूर्ण कार्य संजय देरकर यांच्या नेतृत्वात सुरु आहे. गावागावात शिवसेनेचे कार्यकर्ते तयार झाले आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला भक्कमपणे उभं करण्याचं काम संजय देरकर यांच्या नेतृत्वात सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वात जम्बो पक्षप्रवेश झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकर्ते शिवसेनेकडे वळू लागले आहेत. नुकताच वागदरा येथील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात वागदरा येथे घेण्यात आलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात गावातील अनेक युवकांनी संजय देरकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. युवकांचा शिवसेनेकडे वाढत असलेला कल संजय देरकर यांच्या कुशल नेतृत्वाची पावती आहे. वणी विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या (उबाठा) कोट्यात जाईल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मशाल पेटवायचीच असा ठाम निर्धार संजय देरकर यांनी केल्याचे दिसत आहे. आणि त्याकरिता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. 



No comments:

Powered by Blogger.