प्रशांत चंदनखेडे वणी
वणी नागरी सहकारी बँक लिमिटेड वणी व श्री लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका तथा एकविरा महिला पतसंस्था मारेगावच्या अध्यक्षा व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. किरणताई देरकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
शुभेच्छुक :- राजेंद्र इद्दे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गोवारी (पाथरी), निष्ठावंत शिवसैनिक (उबाठा)
किरणताई देरकर या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. धार्मिक कार्यक्रमांतही त्यांचा नेहमी सहभाग व सहकार्य असतं. महिलांसाठीचं त्यांचं कार्य उल्लेखानीय आहे. महिलांसाठी विविध कार्यक्रम त्या आयोजित करतात. महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी महिलांसाठी एक खास व्यासपीठ स्थापन केलं आहे. स्त्रियांच्या सन्मानार्थ त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. स्त्री सक्षमीकरणाचा आवाज त्यांनी बुलंद केला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्या प्रखरतेने आवाज उठवितात. गरजू गरीब स्त्रियांना त्या उतस्फुर्तपणे मदत करतात. त्यांची सामाजिक कार्याची तळमळ समाजाविषयीच्या आत्मीयतेची जाणीव करून देते. स्त्रियांच्या हक्क व अधिकारांसाठीचं त्यांचं कार्य त्यांची ओळख बनली आहे. स्त्रियांसाठी रणरागिणी बनून त्या कार्य करतात. त्यांच्या रूपाने स्त्रियांना एक उत्तम नेतृत्व मिळालं आहे. सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी एक चळवळ उभारली आहे. यातून अनेक महिलांना त्यांनी सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या स्त्रियांसाठी झुंजार कार्य करणाऱ्या सौ. किरणताई देरकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याचा अनंत शुभेच्छा !
सौजन्य :- लोकसंदेश न्यूज परिवार वणी


No comments: