Latest News

Latest News
Loading...

अपंगत्वाने रोखलेली वाट विजय चोरडिया यांनी केली खुली, अपंग गजाननला भेट दिली तीन चाकी सायकल

प्रशांत चंदनखेडे वणी 

भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा समाजधुरीण विजय चोरडिया यांनी सामाजिक जाणिवेतून एका अपंग व असहाय्य व्यक्तीला तीन चाकी सायकल भेट दिली. त्यामुळे त्याची आता जीवनाच्या वाटेवरील आधाराची गरज दूर झाली आहे. त्याला सक्षम आधार देण्याचं काम विजय चोरडिया यांनी केलं आहे. त्याचं लाचारीचं जगणं दूर झाल्याने त्याने विजय चोरडिया यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. 

मारेगाव तालुक्यातील कानडा येथील गजानन क्षिरसागर हा जन्मापासून पायाने अधू आहे. त्याला आधाराशिवाय चालता येत नाही. या दिव्यांग व्यक्तीबाबत विजय चोरडिया यांना माहिती मिळाली. त्याच्या अपंगत्वाला आधाराची गरज असल्याचे विजय चोरडिया यांना कळताच त्यांनी लगेच त्याची भेट घेऊन त्याला तीन चाकी सायकल भेट दिली. गजानन हा अपंगत्वामुळे लाचार झालेला असतांना त्याच्या जगण्याला बळ मिळावं या प्रामाणिक हेतूने विजय चोरडिया यांनी निस्वार्थ भावनेतून त्याला सायकल भेट दिली. त्यामुळे त्यांचं सामाजिक क्षेत्रातून मोठं कौतुक होत आहे. आधाराशिवाय जाणे येणे करतांना होणारा त्रास दूर झाल्याने गजानन क्षिरसागर यांनी विजय चोरडिया यांचे मनापासून आभार मानले आहे. गजानन याला दैनंदिन कामे तर सोडाच काही अंतर आधाराशिवाय चालणं कठीण व्हायचं, परंतु आता त्याच्या जीवनाला गती मिळाली आहे. त्याच्या जगण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अपंगत्वाने रोखलेली त्याची वाट विजय चोरडिया यांनी खुली करून दिल्याने गजाननच्या आनंदाला पारावार उरला नाही.  

विजय चोरडिया यांची दातृत्व भावना सर्वश्रुत आहे. दातृत्वाचे धनी म्हणून त्यांची वणी विधानसभा क्षेत्रात ओळख आहे. सामाजिक उत्तरदायित्वातून ते सदैव गरजू गरिबांना मदत करतात. अनेक गरजवंतांना त्यांच्या हातून मदत घडली आहे. गोरगरीब व गरजूंच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची वणी विधानसभा क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे. कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. सामाजिक कार्यात त्यांचं भरीव योगदान राहिलं आहे. सामाजिक जाणीव जपणाऱ्या विजय चोरडिया यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सढळ हाताने मदत केली आहे. दुःखीतांचे अश्रू पुसणारे विजय चोरडिया हे वणी विधानसभा क्षेत्रात दानशूर व्यक्ती म्हणून नावारूपास आले आहेत

No comments:

Powered by Blogger.