Latest News

Latest News
Loading...

वयोवृद्ध इसमाच्या डोक्यावर काठी मारून केले जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

एका वयोवृद्ध इसमाशी विनाकारण वाद घालीत त्याच्या डोक्यावर काठीने मारून जखमी केल्याची घटना ११ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता झरी जामणी तालुक्यातील पार्डी या गावात घडली. याबाबत पोलिस स्टेशन देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. बापूराव बोदलू टेकाम (६०) असे तक्रारकर्त्याचे तर सुधाकर नागोराव टेकाम (४५) असे आरोपीचे नाव आहे. 

पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पार्डी या गावात वास्तव्यास असलेल्या बापूराव टेकाम यांना त्याच गावातील सुधाकर टेकाम या त्यांच्या नातेवाईकाने विनाकारण वाद घालून मारहाण केली. बापूराव टेकाम यांच्या डोक्यावर काठी मारून त्यांना जखमी केले. आरोपी सुधाकर टेकाम याला दारूचे व्यसन असून दारू पियुन आला की तो नेहमी बापूराव टेकाम यांना शिवीगाळ करतो. त्याला हटकले की तो जीवे मारण्याची धमकी देतो. ११ ऑक्टोबरला गावात देवीच्या जेवणाचा कार्यक्रम असतांना आरोपी हा दारू पियुन आला. बापूराव टेकाम हे जेवण सुरु असलेल्या ठिकाणी कुत्र्याला हाकलत असतांना आरोपीने कुत्र्याला का हाकलतो म्हणून बापूराव टेकाम यांच्याशी वाद घातला. त्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या डोक्यावर काठी मारली. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यावेळी गावातील काही लोकही तेथे हजर होते. त्यानंतर बापूराव टेकाम यांच्या मुलाने त्यांना उचलून पोलिस स्टेशनला आणले. बापूराव टेकाम यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी सुधाकर टेकाम या आरोपीवर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५१ (२), ३५१(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.