उमेदवारांच्या प्रचार तोफा आज थंडावल्या, निवडणुकीसाठी प्रशासन झालं सज्ज, शहरात ४९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणुकीची प्रचार धुमाळी आज शांत झाली. १८ नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रचार तोफा थंडावल्या. ५ नोव्हेंबर पासून उमेदवारांनी सुरु केलेला प्रचार आज थांबला. २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजता पासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. २० नोव्हेंबरला उमेदवारांचं भाग्य मशिनबंद होईल. वणी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या १२ उमेदवाराचं भाग्य २ लाख ८४ हजार मतदार ठरवणार आहेत. त्यामुळे मतदार राजा हा कुणाचं भाग्य उजाळतो हे २३ नोव्हेंबरला मत मोजणीतून समोर येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता प्रशासही सज्ज झालं आहे. निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता पोलिसांचाही तगडा बंदोबस्त राहणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात असणार आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना असुविधा होणार नाही, याकडेही प्रशासनाचं पूर्ण लक्ष राहणार आहे. शहारत एकूण ४९ मतदान केंद्र देण्यात आली आहे. ४९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ४९ मतदान केंद्रांचीही प्रशासनाने बारकाईने पाहणी केली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकूणच प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment