वंचित बहुजन आघाडी ठरू शकते गेम चेंजर, राजेंद्र निमसटकर यांच्या प्रचारार्थ वंचित समर्थक उतरले मैदानात
प्रशांत चंदनखेडे वणी
वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली आहे. भल्याभल्यांची गणितं वंचित बहुजन आघाडीने बिघडविली आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी नेहमीच वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतला आहे. वंचितशी जुळलेला बहुजन वर्ग आजही एकनिष्ठ आहे. हा वर्ग वंचितचा खंदा समर्थक आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांचे डावपेच पालथे घालण्यात महत्वाची भूमिका वठवू शकते, असे जाणकारांचे मत आहे. वणी मतदार संघातून वंचितने राजेंद्र निमसटकर यांच्या रूपात जाणकार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे. त्यांची पत्रकार म्हणून संपूर्ण मतदार संघात ओळख आहे. त्यांनी वंचितच्या माध्यमातून तगडे आव्हानही उभे केले आहे. हायटेक प्रचार न करता पारंपरिक पद्धतीने प्रचार करून त्यांनी नागरिकांची मने जिंकली आहेत. पथनाट्यातून त्यांनी मतदार संघाची परिस्थिती व आपली राजकीय भूमिका मांडली आहे. मतदार संघातील नागरिकांच्या थेट भेटी घेत त्यांनी आपला प्रचार केला आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत त्यांनी मतदार संघ पिंजून काढला आहे. नागरिकांमधून त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता ते गेम चेंजरची भूमिका वठवू शकतात, असा सूर मतदार संघात उमटू लागला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत राज्यात सर्वत्र प्रचाराचा धडाका सुरु असतांना यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदार संघात उल्लेखनीय प्रचार करीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र निमसटकर यांना प्रचारा दरम्यान मिळत असलेला प्रतीसाद बघता आणी गांव खेड्यातील लोकांशी त्यांची असलेली जवळीक बघता, ते इतरांचे गणीत बिघडवतील असे चित्र वणी मतदार संघात दिसत आहे. इतर उमेदवार हे भव्य प्रचार व गाड्यांचा ताफा घेऊन फिरत असतांना राजेन्द्र निमसटकर हे मात्र मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत आहेत. गावागावात जाऊन ते युवक मंडळ व महिला बचत गट यांच्याशी संवाद साधत आपला प्रचार करीत आहेत. या दरम्यान गावागावात त्यांना मोठा प्रतीसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र वणी विधानसभा मतदार संघात दिसुन येत आहे.
एकूणच निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली असतांना वणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये शहरापासुन तर गाव खेड्यापर्यत दिसत असलेले राजकीय चित्र बघता वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर हे गेम चेंजर ठरू शकतात, अशी चर्चा मतदार संघातून ऐकायला मिळत आहे.
Comments
Post a Comment