वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर यांनी अवलंबली पारंपरिक प्रचार पद्धती, प्रचाराला मिळत आहे भरगोस प्रतिसाद
प्रशांत चंदनखेडे वणी
वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक आखाड्यात उतरलेल्या राजेंद्र निमसटकर यांच्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. वणी मतदार संघात त्यांचे जोरदार प्रचार दौरे सुरु आहेत. ठिकठिकाणी प्रचार सभा घेतल्या जात आहे. पत्रकार म्हणून ते वणी मतदार संघात सर्वांनाच परिचित आहेत. त्यांच्या प्रचार दौऱ्यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हायटेक प्रचार न करता ते पारंपरिक पद्धतीने प्रचार करीत आहेत. त्यांनी प्रचाराची एक अनोखी पद्धतही अवलंबली आहे. मतदार संघात ते पथनाट्यातून आगळा वेगळा प्रचार करीत आहेत. सिलेंडर हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. हे सिलेंडर स्वस्त करण्याकरिता तथा शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांचे प्रश्न व मतदार संघातील समस्या सोडविण्याकरिता त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. मात्तबर नेत्यांना टक्कर देण्याचं धाडस करून त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली आहे. प्रचारातूनही त्यांनी प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान उभं केलं आहे. वंचितचा ग्राउंडचा मतदार असलेला वर्ग त्यांच्या पाठीशी असून वैचारिक पातळी जोपासणारा बहुजनवर्गही त्यांच्या उमेदवारीने वंचितकडे वळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले राजेंद्र निमसटकर हे गेम चेंजर ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.
आजतागायत इथल्या भांडवलवादी यंत्रणानी सामान्य लोकांच्या मतांचा वापर करुण आपल्या सात पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती कमाउन ठेवली. मात्र, जनतेला दारिद्रयाच्या खाईत लोटलं. दिंवसेंदिवस जनता गरीब होतं चाललेली आहे. एकेकाळचा मध्यमवर्गीय, श्रीमंत असलेले कुटुंब आज गरीबीच्या खाईत लोटले गेले आहेत. मागासवर्गीय जनतेला गुलाम करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. गावखेड्यातील गरीबांची लेकरं शिकत असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत. आश्रम शाळांची दुरावस्था होत आहे. गरीबीचं प्रमाण वाढत आहे. आया बहिणी सुरक्षित नाहीत. गेल्या ७७ वर्षांत सत्तेतील आणी विरोधी पक्षांनी या देशातील राज्यातील जनतेचं वाटोळं केलं आहे.
जर ही बिघडलेली परिस्थिति सुधारवायची असेंल तर वंचित बहुजन आघाड़ीचे उमेदवार राजेन्द्र निमसटकर यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन ते गाव खेड्याततील जनतेला करीत आहे. सदर आवाहनास गावागावातील लोकही प्रतीसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. गावकरी स्वत:हुन गावसभांचे आयोजन करुण राजेन्द्र निमसटकर यांना आमंत्रित करतांना दिसत आहेत.
आता पर्यंत पक्षांनी भाकरी फिरवली नाही. तेच ते उमेदवार आमच्या डोक्यावर मारले आहेत. ज्यांना जनतेने वांरवांर नाकारले त्यानांच अधिकृत पक्ष उमेदवारी देतो. या सर्वांचा आम्हास उब आला आहे. आता जनताच भाकरी फिरवेल, अशी आशा जनमाणसांमध्ये राहुण काम करणाऱ्या राजेन्द्र निमसटकर यांना आहे. जनताही त्यांना पाठीशी उभे राहण्याची ग्वाही देत आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाड़ीला यावेळी यश मिळेल, हा आशावाद राजेंद्र निमसटकर हे व्यक्त करतांना दिसत आहे. तसेच गाव खेड्यातील जनमानसाच्या या बोलत्या प्रतिक्रिया आहेत.



No comments: