प्रशांत चंदनखेडे वणी
महाविकास आघाडीत वणी मतदार संघ हा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने संजय खाडे हे प्रचंड निराश झाले. काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या संजय खाडे यांनी शेवटी काँग्रेसशी बंडखोरी केली. अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात दंड थोपटल्याने त्यांना पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या कारणावरून तथा पक्षशिस्तीचा भंग केल्याने पक्षश्रेष्ठींनी ६ वर्षांकरिता पक्षातून निलंबित केले आहे. तसा जाहीरनामाही पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. माजी आमदार वामनराव कासावार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा आदेश सर्वांपुढे जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस समर्थित उमेदवार म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मोठा धक्का बसला आहे.
मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावान म्हणून संजय खाडे यांनी पक्षाचं कार्य केलं आहे. काँग्रेसच्या धेय्य धोरणांवर चालतांना त्यांनी पक्ष विरोधी कधी कोणतीच भूमिका घेतली नाही. पक्षाचं कार्य निरंतर वाढविण्यावर त्यांनी भर दिला. अनेक जनहितकारी कार्य त्यांनी पक्षाच्या नावावर केले. मोठंमोठे राजकीय कार्यक्रम त्यांनी मतदार संघात आयोजित केले. नंतर त्यांना उमेदवारीचे डोहाळे लागले. काँग्रेस कडून उमेदवारी मिळेलच अशी शाश्वती त्यांना होती. त्यांनी काँग्रेस कडून उमेदवारी मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न देखील केले. मात्र वणी मतदार संघ हा शिवसेनेच्या कोट्यात गेला. आणि संजय देरकर यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीची साथ देणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं. पक्षाशी बंड पुकारून त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. त्यामुळे पक्षात प्रचंड अस्वस्थता पसरली. त्यांच्या पक्ष विरोधी भूमिकेने मतदार संघातील वातावरण अस्थिर झाले. त्यांची बंडखोरी महाविकास आघाडीत नाराजीचं कारण बनल्याने त्यांना काँग्रेस मधून ६ वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून तसा जाहीरनामाही काढण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचा हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे काँग्रेस समर्थित उमेदवार म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मोठा धक्का बसला आहे.


No comments: