Latest News

Latest News
Loading...

श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेकडून सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रशांत चंदनखेडे वणी 

आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. नात्यात गोडवा निर्माण करणारा सण म्हणजे दिवाळी. नात्यांची गुंफण करणारा सण म्हणजे दिवाळी. प्रेमाचे नाते आणि नात्यात प्रेम भरणारा सण म्हणजे दिवाळी. सर्व गणगोत एकत्र येऊन पारिवारिक हितगुज करीत आनंदाच्या वातावरणात दिवाळी साजरी करतात. न कळत मनात दाटलेला काळोख प्रेमळ शब्दांनी उजळून काढण्यात दिवाळी या सणाची साथ लाभते. विखुरलेल्या परिवाराला एकत्र आणण्याचं सामर्थ्य दिवाळी या सणात आहे. आणि परिवाराचा आनंद टिकवून ठेवण्याचं काम श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेनं केलं आहे. परिवाराच्या आनंदात सदैव सहभागी असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ग्राहकांना, ठेवीदारांना, गुंतवणूकदारांना व सर्व जनतेला दिवाळीच्या आनंदायी शुभेच्छा !

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली व ग्राहकांचा विश्वास संपादन करणारी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्था नागरिकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरिता सर्वोतपरी आर्थिक सहकार्य करते. श्री रंगनाथ स्वामी ही नागरिकांच्या हक्काची पतसंस्था असून नागरिकांच्या आर्थिक अडचणीत ही पतसंस्था नेहमी अर्थ सहाय्य करते. व्यवसायात असो की गृह निर्माणात या पतसंस्थेने नागरिकांना नेहमी आर्थिक बळ दिलं आहे. आणि म्हणूनच नागरिकांच्या स्वप्नांना आकार देणारी पतसंस्था म्हणून ही पतसंस्था नावारूपास आली आहे. 

रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे संचालक मंडळ, ऑफिस स्टाफ, कर्मचारी वृंद व कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या कडून सर्व ग्राहकांना व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

No comments:

Powered by Blogger.