संजय देरकर यांना समर्थन देणाऱ्यांचा कल वाढला, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघानेही दर्शविला जाहीर पाठिंबा
प्रशांत चंदनखेडे वणी
महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांना घटक पक्ष व संघटनांचा मिळणारा पाठिंबा त्यांच्या कुशल नेतृत्व व लोकप्रियतेची नांदी मानली जात आहे. संजय देरकर यांना घटक पक्ष व संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यांच्या प्रचार सभांनाही भरगोस प्रतिसाद मिळू लागला आहे. संजय देरकर यांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढतच आहे. राजकीय क्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघानेही त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यावरून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा समर्थक वर्ग मोठा असल्याचे दिसून येत आहे.
संजय देरकर यांनी पक्षाचे सूत्र हाती घेतल्यानंतर विखुरलेले कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने पक्षाशी जुळले. सर्व पदाधिकारीही एकत्र आले. अनुभवी नेत्यांनीही संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला. संजय देरकर यांनी वणी विधानसभा क्षेत्रात पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते एकजूट झाले. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाली. आता त्यांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ही त्यांच्या वणी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रियतेची नांदी मानली जात आहे. शिवसेनेची धगधगती मशाल हातात घेऊन ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने हे परिवर्तनाचे संकेत मानले जात आहे. राजकीय परिस्थितीची जान ठेवणाऱ्या अखिल भारतीय सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या वणी शाखेने संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यांना पाठिंबा व समर्थन देणाऱ्यांचं प्रमाण वाढतच असल्याने त्यांच्या विश्वासाला उमेदीची भरारी मिळू लागली आहे. महाविकास आघाडीकडे जनतेचा वाढत असलेला कल येणाऱ्या सुवर्ण काळाचे संकेत मानले जात आहे.

No comments: