वेकोलीचा अधिकारीच निघाला भंगार चोरीचा मास्टर माईंड, एम. एस. एफ. जवानांनी केला भंगार चोरीचा भांडाफोड

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

वेकोलीच्या उकनी कोळसाखानीतून जुने लोखंडी साहित्य (भंगार) चोरी करून वणी येथील एका भंगार दुकनात विक्री करिता आणले. मात्र वेकोलिचे सुरक्षा रक्षक व एम.एस. एफ. जवानांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या चोरी प्रकरणाचं भांडं फुटलं. 26 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता एका मालवाहू वाहनातून भंगार चोरी करण्यात असल्याची माहिती एम.एस.एफ. जवानांना मिळाली. त्यांनी परिसरात त्या वाहनाचा शोध घेतला असता ते वाहन भालर येथे सापडले. त्यांनी वाहन चालकाकडे भंगार चोरी बाबत चौकशी केली असता त्याने उप प्रबंधक यांनीच वाहनात भंगार भरून दिल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले भंगार सत्तार यांच्या भंगार दुकानासमोर खाली केल्याचेही चालकाने सांगितले.  तब्बल 9.5 टन भंगार एका वाहनातून चोरी करून विक्री करिता आणले होते. अंदाजे 30 हजार रुपये टन या प्रमाणे 2 लाख 85 हजार रुपये किमतीच्या या भंगार चोरी प्रकरणात वेकोलीच्या अधिकाऱ्याचाच हात असल्याचे समोर आले आहे. एम.एस.एफ. जवानांनी कोळसाखानीतून चोरून आणलेले भंगार व चोरी करण्याकरिता वापरलेले वाहन (MH 40 CM 6928) जप्त करून शिरपूर पोलिस स्टेशनला लावले. त्यानंतर  वेकोली अधिकारी व वाहन चालकाविरुद्ध रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

वेकोलिच्या भंगारावर नेहमीच चोरट्यांची नजर असते. डाव साधून चोरटे कोळसाखानीतील भंगारावर हात साफ करतात. आता तर वेकोलीचे अधिकारीच चोरट्यांसोबत मिळून चोरीचा डाव साधू लागले आहेत. वेकोलीच्या उकनी कोळसा कोळसाखानीत जमा असलेले जुने लोखंडी साहित्य एका मालवाहू वाहनात लोडर मशीनच्या साहाय्याने लोड करून ते वणी येथील सत्तार नामक भंगार दुकानदाराकडे विकण्याकरिता आणण्यात आले. विशेष म्हणजे उकनी कोळसाखाणीच्या यांत्रिकी विभागाचे उप प्रबंधक अनुप कुमार साही हेच भंगार चोरीचे मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे. त्यांनीच मालवाहू वाहनात भंगार लोड करून देण्यात मदत केली. वाहन चालक अतुल गजानन पिदुरकार रा. कोलारपिंपरी याने तशी कबुलीही दिली आहे.  वेकोलीच्या उकनी व जूनाड कोळसाखानीचे उपखेत्रिय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी उकनी कोळसाखाणीच्या यांत्रिकी विभागाचे उप प्रबंधक व वाहन चालक या दोघांविरोधात पोलिस स्टेशनला रितसर तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून शिरपूर पोलिसांनी दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी