शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, तरुणाची प्रकृती अत्यवस्थ

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली. तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दिवसाढवळ्या राहत्या घराच्या आवारात तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रणय मुकुंद मुने वय अंदाजे २५ वर्षे रा. माळीपुरा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर हे हिंगणघाट जि. वर्धा येथील रहिवाशी असल्याचे समजते. पोलिसांनी अजिंक्य चौधरी वय अंदाजे २५ वर्षे व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील मध्यवस्तीत वर्दळीचे ठिकाण असलेल्या घरसंसार सेलजवळ राहणाऱ्या प्रणय मुने या तरुणावर दोन गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी राहत्या घराच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला चढविला. प्रणयच्या गळ्यावर अमानुषपणे शस्त्राचे वार करण्यात आले. निर्दयीपणे प्रणयचा गळा चिरण्यात आला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  हल्लेखोर हे हिंगणघाट जि. वर्धा येथील रहिवाशी असल्याचे समजते. तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या अजिंक्य चौधरी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

घराच्या आवारात शिरून आरोपींनी प्रणय मुने याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याच्या किंचाळण्या ऐकून घराशेजारी राहणारी नातेवाईक महिला प्रणयच्या घराजवळ धावून आली. प्रणय हा रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे पाहून महिलेने आरडाओरड करण्यास सुरवात केली. महिलेच्या आरडाओरड करण्याने आसपासचे नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी दोन्ही आरोपींना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या प्रणय मुने याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. वणी सारख्या शांत शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्याने चिंता निर्माण झाली आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये होत असलेली वाढ शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू लागली आहे. घरात शिरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आल्याने शहर हादरले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी