प्रशांत चंदनखेडे वणी
शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या ११ नोव्हेंबरला वणी शहरात दणदणीत जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी ते वणीला येणार आहेत. येथील शासकीय मैदानावर (पाण्याची टांकी) सकाळी ११ वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांचं वणी मतदार संघात आगमन होणार असल्याने जनतेला या सभेची प्रचंड उत्सुकता लागली आहे. राजकीय वर्तुळाचंही या प्रचार सभेकडे लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागतील हे निश्चित. आपल्या विशिष्ट शैलीत ते सत्ताधाऱ्यांचे चिमटे काढणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धेय्य धोरणांवर ते सडकून टीका करतील, यात शंका नाही. या जाहीर सभेत उद्धव ठाकरे कडाडणार असल्याने नागरिकांना या सभेची प्रचंड आतुरता लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला जनसागर उसळणार असल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे संजय देरकर यांच्या प्रचारार्थ वणीला येणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जिकडे तिकडे उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेचीच चर्चा रंगली आहे. वणी मतदार संघातील जनतेलाही उद्धव ठाकरे यांच्या सभेची प्रचंड उत्सुकता लागली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे वणी येथे प्रचार दौऱ्यावर येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. वणी येथे त्यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्तेही प्रचार सभेच्या तयारीत लागले आहेत. वणी मतदार संघातून शिवसेनेने विजयी सुरवात केली होती. तोच इतिहास परत रचण्याकरिता शिवसेना सज्ज झाली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असल्याने वणी मतदार संघातील लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. वणी मतदार संघात विजय साकार करण्याच्या भूमिकेतूनच आता संजय देरकर यांना डावपेच आखावे लागणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेने वातावरण बदलेल असा सूर उमटत असला तरी रणनीती कशा प्रकारची असेल यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मतदारांचा कौल मिळविण्यात कितपत यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. परंतु त्यांच्या प्रचार सभेकडे वणी मतदार संघातील जनतेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


No comments: