Latest News

Latest News
Loading...

प्रगती नगर येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीच्या वस्तूंवर केला हात साफ

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या बंद घरांना चोरटे टार्गेट करू लागले आहेत. शहरातील प्रगती नगर येथील बंद घराला टार्गेट करून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू व रोख रक्कमेवर हाथ साफ केला. ही घटना ८ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान घडली. ९ नोव्हेंबरला सकाळी घराचं दार उघडं दिसल्याने ही घटना उघडकीस आली. 

शहरातील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले निकेश अरुण माकडे (४४) हे दिवाळी निमित्त परिवारासह बाहेरगावी गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. घराचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील एका लोखंडी कपाटात ठेऊन असलेले रोख ४० हजार ५०० रुपये व दुसऱ्या लाकडी कपाटातील चांदीच्या तीन वाट्या, एक चमच, एक गडू, दोन करंडे, तीन नाणी व तीन चांदीचे बिस्कीट एकूण वजन ५०० ग्राम किंमत ५ हजार रुपये तसेच १० रुपयांच्या नोटांचे विस बंडल (२० हजार रुपये), ५०० रुपयांच्या १४ नोटा (७ हजार रुपये) असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. निकेश माकडे हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असतांना त्यांचा दरवाजा उघडा दिसल्याने ही घटना उघडकीस आली. निकेश माकडे यांनी घरी येऊन बघितले असता त्यांना घरातील दोनही कपाटातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३३१ (३), ३३१(४), ३०५ (A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 



No comments:

Powered by Blogger.