विभागस्तरीय कराटे स्पर्धेत वणी पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी चमकली, पटकावला प्रथम क्रमांक


प्रशांत चंदनखेडे वणी 

विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत वणी पब्लिक स्कुलची इयत्ता ९ वीची विद्यार्थिनी कु. योगेश्वरी प्रशांत डोनेकर ही चमकली. कराटे चॅम्पियन असलेल्या या विद्यार्थिनीने या स्पर्धेत परत एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. उत्तम खेळाचे प्रदर्शन करून या क्रीडा स्पर्धेत तिने यश मिळविले आहे. १७ वर्ष वयोगटात तिचा प्रथम क्रमांक आला आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रमातून तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या भूतपूर्व यशाने ती धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता पात्र ठरली आहे. २८ नोव्हेंबरला धुळे येथे महाराष्ट्र राज्य शालेय कराटे स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतही ती मैदान गाजवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कु. योगेश्वरी या विद्यार्थिनींची दुसऱ्यांदा राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली, हे याठिकाणी विषेय उलेखनीय आहे. 

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या माध्यमातून यवतमाळ येथे विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वणी पब्लिक स्कुलची विद्यार्थिनी कु. योगेश्वरी प्रशांत डोनेकर हिने यशस्वी कामगिरी केली. या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विभागस्तरीय कराटे स्पर्धेत तिने आपली चमक दाखविल्याने तिची धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड पक्की झाली आहे. कू. योगेश्वरी ही झरी पंचायत समितीचे ग्रामसेवक प्रशांत डोनेकर यांची मुलगी आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, शाळेचे प्राचार्य, शिक्षक तथा कराटे प्रशिक्षकांना दिले आहे. विभागस्तरीय कराटे स्पर्धेत योगेश्वरी या विद्यार्थिनीने नेत्रदीपक कामगिरी केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी