महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याकरिता संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील : संजय खाडे


प्रशांत चंदनखेडे वणी 

शिक्षणाअभावी माणूस अविचारी बनतो. त्याला जीवनाचं उद्दिष्ट कळत नाही. तो वास्तविकतेपासून भरकटला जातो. त्याला परिस्थितीची जान राहत नाही. तो काल्पनिक विचारांकडे वळतो. अज्ञान त्याला अंधकाराकडे नेतं. बुद्धिविसंगत विचारांनी तो ग्रासला जातो. वास्तविक जीवनाचं सार त्याला कळत नाही. वैचारिक दृष्टीकोन सोडून तो मानसिक गुलामीकडे वळला जातो. त्यामुळे बुद्धीच्या विकासाकरिता शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच शिक्षण ही मनुष्याची मूलभूत गरज आहे. शिक्षणामुळेच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो, ही शिकवण क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी दिली. महात्मा फुले म्हटतात की, विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, निती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, असा अनर्थ एका अविद्येने केला. म्हणूनच मनुष्याने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण हेच बौद्धिक उन्नतीचं माध्यम आहे. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, असे मनोगत संजय खाडे व्यक्त केले. ते जटाशंकर चौकातील महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या कार्यक्रमाला प्रशांत गोहोकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

संजय खाडे फाउंडेशन द्वारा संचालित महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यतिथी सोहळा पार पडला. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना संजय खाडे यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तसेच शिक्षण व समाजसुधारणेच्या कार्यासाठी संजय खाडे फाउंडेशन सदैव तत्पर राहील अशी ग्वाही दिली. यावेळी प्रशांत गोहोकार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. 

कार्यक्रमाला सूरज गौरकार, निखिल तुरणकर, अक्षय नालमवार, देवांश आसकर, निखिल गानफाडे, शीतल बोर्डे, कुणाल भेले, आकाश घोरपडे, अनिकेत थेरे, दीपक माडेवार, प्रदीप सातपुते, स्वप्निल सातपुते, विवेक खिरटकर, संतोष ताडुलवार, नीतेश विंचू, अमित काळे, शंकर उपरे, शुभम राठोड, दीपक पथाडे, हर्षल मोहितकर यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनचे स्वयंसेवक व अभ्यासिकेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी