Latest News

Latest News
Loading...

भरारी पथकाने कारमधून जप्त केली ३ लाख ६४ हजारांची रोख रक्कम

प्रशांत चंदनखेडे वणी 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालणाऱ्या भरारी पथकाने ५ नोव्हेंबरला रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास नांदेपेरा टी-पॉईंट जवळील रेल्वे क्रॉसिंग येथे एका कारची झडती घेतली असता त्यात ३ लाख ६४ हजार ५५० रुपयांची रोकड आढळून आली. निवडणूक काळात एवढी मोठी रक्कम जवळ बाळगणाऱ्या कार मधील त्या व्यक्तींकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कार्यवाही भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तरित्या केली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक धनराज हाके हे आपल्या सहकाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना एका कारमधून रोख रक्कम नेली जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यांनी नांदेपेरा टी-पॉईंट जवळील रेल्वे क्रॉसिंग जवळ सापळा रचला. त्या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची त्यांनी झडती घेणे सुरु केले. दरम्यान MH २९ BP २३२४ ही कार या मार्गाने आली. या कारला थांबवून कारची झडती घेतली असता त्यात तब्बल ३ लाख ६४ हजार ५५० रुपये एवढी रोख रक्कम आढळली. भरारी पथकाने निवडणूक काळात एवढी मोठी रक्कम जवळ बाळगणाऱ्या रमेश लालचंद डुंगरवाल (५१) रा. रवि नगर, योगेश माधवराव करांडे (४४) रा. जागृती नगर व धिरज भास्करराव सुत्रावे (४५) रा. रंगारीपुरा यांच्या जवळून ही रक्कम जप्त केली. हे तीनही जण व्यावसायिक आहेत. त्यांनी ही रक्कम व्यवसायातून गोळा झाल्याचे सांगितले. ही कार्यवाही भरारी पथक व पोलिसांनी संयुक्तरित्या केली. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.   



No comments:

Powered by Blogger.