प्रशांत चंदनखेडे वणी
अग्निपुरुषाची काळजाचा थरकाप उडविणारी कवायत शहरात सुरु असलेल्या मिना बाजरात पाहायला मिळाली. स्वतःला आग लावून तब्बल ४७ फूट उंचावरून उडी मारणाऱ्या अग्निपुरुषाने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. डोळ्याला विश्वास बसणार नाही असा हा चित्त थरारक खेळ पाहून सर्वांनीच तोंडात बोटे घातली. दिल्ली वरून खास करून मिनी बाजार पाहायला येणाऱ्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी बोलाविण्यात आलेल्या या जिगरबाज कलावंताने दाखविलेल्या अद्भुत खेळाने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या अग्निपुरुषाने आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं शरीर तब्बल ४७ फुटांवरून खाली झोकून देत दाखविलेल्या कवायतीने उपस्थितांची मने जिंकली.
शहरात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मिना बाजारात काल ९ डिसेंबर पासून अग्निपुरुषाचा उंचावरून उडी घेणारा हा चित्त थरारक खेळ दाखविण्यात येत आहे. याचे उद्घाटन काल ऍड. कुणाल चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विलास कालेकर, भगवान मोहिते, संजय देठे, डॉ. विकास गोफणे, समिर लेनगुळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. साई मंदिर जवळ हा मिना बाजार भरविण्यात आला आहे. या मिना बाजारात विविध प्रकारचे झुले, खाद्य पदार्थांची दुकाने, खेळणे व विविध वस्तूंची दुकाने तसेच लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचंच मनोरंजन होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विरंगुळा म्हणून परिवारासोबत आनंद व्यतीत करण्याकरिता शहरवासीयांची पावले या मिना बाजाराकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
No comments: