ग्रामिण रुग्णालयाची सुरक्षा वाऱ्यावर, जनरेटरच्या दोन मोठ्या बॅटऱ्या गेल्या चोरी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी ग्रामिण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेसह सुरक्षा व्यवस्थेचेही प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्रामिण रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था पूर्णतः ढेपाळल्याचे दिसून येत आहे. ग्रामिण रुग्णालयाचा कारभार सध्या चर्चेचा विषय बनला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णालयातील किंमती वस्तूंची सुरक्षा धोक्यात आली आहे. ग्रामिण रुग्णालयातील छोट्या मोठ्या वस्तू चोरी होत असतांनाच आता चक्क जनरेटरच्या दोन मोठ्या बॅटऱ्याच चोरीला गेल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. बॅटऱ्या चोरी झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली असल्याचे डॉ. सुलभेवार यांनी सांगितले आहे. 

विद्युत पुरवठा खंडित झाल्यास रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून ग्रामिण रुग्णालयाला मोठं जनरेटर उपलब्ध करून देण्यात आलं. मात्र या जनरेटरचा रुग्णालयाला कोणताही उपयोग झाल्याचे दिसत नाही. ते तसंच जंग खात पडलं आहे. हजारो रुपये किमतीचं हे जनरेटर केवळ रुग्णालयाची शोभा वाढविण्याच्या कामात आलं आहे. बाकी रुग्णांना या जनरेटरचा कुठलाही उपयोग झालेला नाही. परंतु चोरट्यांनी या जनरेटरच्या दोनही बॅटऱ्या चोरून नेत आपला फायदा मात्र करून घेतला. रुग्णालयात तगडी सुरक्षा व्यवस्था असतांना चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात धूळ झोकून जनरेटरच्या दोन मोठ्या बॅटऱ्या चोरी केल्या. चक्क रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जनरेटरच्या बॅटऱ्यांची झालेली चोरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले असतांनाच आता येथील सुरक्षा व्यवस्थाही कोलमडल्याने रुग्णालयीन प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णालयात सुरक्षा रक्षक तैनात असतांना रुग्णालयातील जनरेटच्या बॅटऱ्या चोरी होत असतील तर रुग्णांच्या वस्तू व साहित्याच्या सुरक्षेची हमी काय, असे प्रश्न आता जनतेतून उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामिण रुग्णालयाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी