प्रशांत चंदनखेडे वणी
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रणय लक्ष्मण मडावी (२२) रा. बोर्डा ता. वणी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन तरुणीला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विविध प्रलोभने व आमिषे दाखवून तिच्याशी जवळीक साधली. एवढेच नाही तर तिला रुपेरी दुनियेचे स्वप्न दाखवून व तिच्याशी लग्न करण्याच्या आणाभाका घेऊन तिला आपल्या वासनेचा शिकार केले. तिचा शारीरिक उपभोग घेतल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे शारीरिक सुखासाठी तरुणाने आपला वापर केल्याचे तिच्या लक्षात आले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणाविरुद्ध पीडितेने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी प्रणय मडावी याच्यावर बीएनएसच्या कलम ६४(२), सहकलम ४,६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
No comments: