Latest News

Latest News
Loading...

भर चौकात तिघांची एकाला मारहाण, तिनही आरोपींवर गुन्हे दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी 

पूर्व वैमनस्यातून एका युवकाला तिघा जणांनी भर चौकात मारहाण केल्याची घटना १५ डिसेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी सचिन सुभाष सूर (३७) रा. रविनगर हा ड्रायव्हिंगचा व्यवसाय करतो. त्याच्या सोबत आरोपींचा जुना वाद आहे. सचिन हा १५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता टिळक चौक परिसरातील राहुल पान टपरी जवळ उभा असतांना आरोपींनी जुना वाद उकरून काढत सचिनला लोखंडी खुर्चीने जबर मारहाण केली. यात त्याच्या उजव्या पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. सचिनने झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी राजशेखर कुमारस्वामी गुंपला (३२), रमेश कुंभारकर (४५), दिव्या राम कुंटावर (३०) तिघेही रा. वणी यांच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय सुरेंद्र टोंगे, एलएचसी सिमा राठोड करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.