यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट कडून परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध

प्रशांत चंदनखेडे वणी 

परभणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना करण्यात आल्याच्या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करण्याऱ्या समाज कंटकाला अटक करण्यात आली असली तरी अशाप्रकारचं निंदनीय कृत्य घडवून आणणारा सूत्रधार कोण याचा शोध घेण्याकरिता जनतेतून आंदोलनं केली जात आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदविला जात असतांनाच यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट वणीच्या वतीने देखील या घटनेचा निषेध नोंदवून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. 

लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाची अवहेलना करण्याचे षडयंत्र काही विकृत बुद्धीच्या लोकांकडून रचले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देश एकसंघ ठेवण्याकरिता सर्वोत्कृष्ठ असं संविधान देशाला दिलं. पण काही संविधान विरोधी विचारांची पिलावळं संविधानाची अवमानना करतांना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वच घटकांना न्याय देणारं संविधान लिहिलं. मात्र काही कुपोषित मेंदूच्या विचारसरणीला हे संविधान अद्याप उमगलं नाही. त्यामुळे त्यांचे संविधान विरोधी उपद्रव सुरु असतात. अशाच एका विकृत मानसिकतेच्या माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विडंबना केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. अशा प्रकारच्या निंदनीय घटना घडत असतांना सरकार ऍक्शन मोडवर आल्याचे दिसत नाही. संविधानाचा अवमान करणे हा राष्ट्रद्रोह असल्याने अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाज कंटकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट वणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा तीव्र निषेध देखील नोंदविण्यात आला आहे. 

निवेदन देतांना रज्जत सातपुते, काजल वाळके, आकाश बोरकर, प्रेम अडकिने, श्वेता माहुरे, इस्माईल खान, सुरज खैरे, राहुल गोस्की, धम्मरूचा दारुंडे, अश्विनी अडकिने, अंकिता पथाडे, आदित्य वाळके, गौरव जवादे, करुणा कांबळे, रेखा पाटील यांच्यासह यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट वणीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी